हिंगोलीत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात तृतीय पंथीयांची मदत
हिंगोली: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता तृतीयपंथी ही पुढे सरसावले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विरुद्धच्या लढ्यात ते योगदान देत आहेत. लॉकडाऊमुळे तृतीयपंथी समुदाय आधीच संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीतही हिंगोली शहरातील १० तृतीय पंथीयांचे पथक कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन करा, तोंडाला माक्स घाला, घराबाहेर पडू नका, कुटुंबाची काळजी घ्या, अशीच साद या तृतीयपंथीयाकडून घातली जातेय.