मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (16:58 IST)

सिरमच्या लसीला DGCI ची मंजुरी

रतीय औषध महानियंत्रण (DGCI) ने ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने संशोधित केलेल्या कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मानवी चाचणीस सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीया (SII) ला मंजुरी देण्यात आली आहे. रविवारी रात्री कोरोना संदर्भातील विषेतज्ञ समितीने चर्चा केल्यानंतर औषध महानियंत्रक डॉ. वी.जी. सोमानी यांनी सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला ही मंजुरी दिली आहे.
 
दरम्यान, कंपनीच्या तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलआधी सुरक्षेसंदर्भातील माहिती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संगठनला ही जमा करावी लागणार आहे. त्यानंतर त्याचे मुल्यांकन माहिती सुरक्षा निरीक्षण बोर्ड करणार आहे. ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे परिक्षण ब्रिटनमध्ये सुरु असून तिसऱ्या टप्प्याचे परीक्षण ब्राझीलमध्ये आणि पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण दक्षिण आफ्रीकेत सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या परिक्षणासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीयाच्या मागणीवर विचार करण्यात आला आहे. एसईसीने २८ जुलैला यासंदर्भात आणखी माहिती मागवली होती. तसेच प्रोटोकॉलमनुसार संशोधन करण्यास सांगितले होते. एसआयआयने संशोधित प्रस्ताव बुधवारी जमा केला असून या क्लिनिकल ट्रायलसाठी ठिकाणांची निवड पूर्ण देशातून करण्यात यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.