सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (23:07 IST)

आता नोजल स्प्रे दूर करेल कोरोना, जाणून घ्या किती प्रभावी आहे

आता कोरोनाशी लढण्यासाठी नोजल स्प्रेही बाजारात आले आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ने नाकावरील पृष्ठभागावर वापरण्यासाठी हा नेजल स्प्रे लॉन्च केला आहे. 

कोविड रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेल्या या नोजल स्प्रेचे नाव नायट्रिक ऑक्साइड आहे. फेबिस्प्रे ब्रँडअंतर्गत  नायट्रिक ऑक्साइड भारतात लॉन्च करण्यात आले आहे. ग्लेनमार्कने सॅनोटीझ या कॅनेडियन कंपनीच्या सहकार्याने हा स्प्रे विकसित केला आहे. या स्प्रेला औषध नियमकाकडून मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंगसाठी मान्यता देण्यात आली आहे. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, नायट्रिक ऑक्साइडवर आधारित हा स्प्रे नाकाच्या वरील भागावर कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्याचे काम करतो. हे खूप प्रभावी असल्याचे चाचणी दरम्यान दिसून आले आहे. हे नेजल स्प्रे नाकाच्या म्युकस वर स्प्रे केल्यावर ते शरीरात विषाणू वाढण्यास प्रतिबंधित करते. 

कंपनीने याचे वर्णन प्रभावी उपचार म्हणून केले आहे. रॉबर्ट क्रॉकरट, सीईओ, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड म्हणाले, ''आम्हाला खात्री आहे की रुग्णांना आवश्यक आणि वेळेवर उपचार प्रदान करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे .