सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (18:59 IST)

जनता कर्फ्यू चे एक वर्ष पूर्ण झाले आणि देशात पुन्हा कोरोना बेलगाम झाले

1 वर्षापूर्वी या दिवशी जनता कर्फ्यू लावण्यात आले होते. याचा उद्देश्य कोरोनाच्या विरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासह कोविड 19 साठी सतर्क करणे देखील आहे. 
एक वर्षा नंतर भारताच्या परिस्थितीवर दृष्टी टाकावी तर देशात कोरोनाव्हायरस च्या विरुद्ध अनेक लसीकरण मोहिमे सुरु आहेत. दरम्यान कोरोनाची लाट वेगाने वाढत आहे. आता तर लोक मास्क शिवाय फिरत आहेत.सरकार आणि प्रशासनाच्या काटेकोर बंदीनंतर देखील लोक या बाबतीत गांभीर्य घेत नाही. जनता कर्फ्यू नंतर 25 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्याचे जाहीर केले होते.   
सर्व लोक आपल्या घरात कैद झाले. रस्त्यांवर शांतता पसरली.आता 1 वर्षा नंतर देखील भारतातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जरी कोरोनाविषाणूंच्या विरुद्ध दोन लसा  उपलब्ध झाल्या आहेत, आणि लोकांना वयोगटानुसार देखील लसीकरण देण्यात येत आहे.
 
नोव्हेंबर 2020 पासून कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे, परंतु यावर्षी 11 फेब्रुवारीपासून या प्रकरणांमध्ये वाढ होऊ लागली आहे. रविवारी, 21 मार्च रोजी देशात कोरोनाचे, 4,38,466 रुग्ण आढळले, जवळपास चार महिन्यांत एकाच दिवसात सर्वाधिक नोंद झाली.
 
कोरोनाचे वाढते प्रकरण-
लसीकरण मोहिमेदरम्यान देशात कोरोनाव्हायरस झपाट्याने वाढत आहे. सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्राची आहे. रविवारी महाराष्ट्रात 30,535 प्रकरणे समोर आले. एका दिवसात कोरोना प्रकरणांची ही विक्रमी संख्या आहे. यासह, राज्यात कोरोनाची एकूण संख्या 24,79,682 वर पोहोचली आहे.तर मृतांचा आकडा महाराष्ट्र राज्यात 53,399 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे सांगितले जात आहे.