तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजा यांचा धनंजय मुंडेना फोन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय शत्रू आहे. मात्र धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याचे कळताच पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली. स्वत:ची काळजी घे, कुटुंबाची काळजी घे. आई आणि लहान मुली आहेत. कोरोनातून लवकर बरा हो, असे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुडेंना सांगितल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत पंकजा आणि धनंजय मुंडे परळी मतदरासंघात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यावेळी प्रचाराची पातळी खालावल्याने दोघांमध्ये बरेच वितुष्ट निर्माण झाले होते. त्यानंतर पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी प्रथमच एकमेकाशी संवाद साधला आहे.
धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आली असून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले . धनंजय मुंडे यांना श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. आठ ते दहा दिवसात कोरोनावर मात करतील, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.