रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated :नवी दिल्ली , गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (22:23 IST)

Reliance Foundationने केरळला कोरोना लसीचे 2.5 लाख डोस मोफत दिले

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची धर्मादाय शाखा रिलायन्स फाउंडेशनने गुरुवारी सांगितले की, त्यांनी केरळ सरकारला कोरोनाव्हायरस कोविड -19 लसीचे 2.5 लाख डोस मोफत दिले आहेत. रिलायन्सच्या शिष्टमंडळाने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची औपचारिक भेट घेतली आणि लसीचा डोस देण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली.
 
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष नीता एम अंबानी म्हणाल्या की, विषाणूंपासून लोकांना वाचवण्यासाठी सामूहिक लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. देशभरात मोफत लसीकरणासाठी आम्ही मिशन लस सुरक्षा सुरू केली आहे. या 2.5 लाख मोफत लसीकरणाच्या डोससह, रिलायन्स फाउंडेशनने या गरजेच्या वेळी केरळच्या लोकांना पाठिंबा दिला आहे. 
लसीचा डोस गुरुवारी कोचीला पोहोचला आणि तो केरळ वैद्यकीय सेवा महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. केरळ सरकारच्या वतीने एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी जाफर मलिक यांना लसीचा डोस मिळाला. या लसींचे वितरण केरळ आरोग्य विभागामार्फत केले जाईल. (भाषा)