सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मॉस्को , मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (15:26 IST)

रशियाने कोरोनाव्हायरसची लस बनविली, अध्यक्ष पुतिन यांच्या कन्याला लावली पहिली लस

मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी असा दावा केला की त्यांच्या देशाने कोरोनाव्हायरसच्या पहिल्या लसीला मान्यता दिली आहे.
 
पुतीन म्हणाले की जगातील प्रथम यशस्वी कोरोना विषाणूची लस आहे. त्याला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. पुतीन म्हणाले की, त्यांच्या मुलीला ही लस दिली होती.
 
मॉस्कोच्या गेमलिया संस्थेने ही लस विकसित केली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही लस यशस्वी म्हटले आहे. यासह, व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले की लवकरच या लसीचे उत्पादन रशियामध्ये सुरू केले जाईल आणि मोठ्या प्रमाणात लसींचे डोस केले जातील.
 
रशियन अध्यक्ष म्हणाले की, त्यांच्या मुलीला कोरोना विषाणू झाला होता, त्यानंतर तिला नवीन लस दिली गेली. तिचे तापमान थोड्या काळासाठी वाढले परंतु आता ती एकदम ठीक आहे.
 
तथापि, जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने रशियाच्या लसीबाबत शंका व्यक्त केली होती आणि म्हटले होते की रशिया घाईघाईत ही लस आणत आहे.