शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (12:20 IST)

2 करोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क हरवले

औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला ज्यात करोना पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण हरवल्याची बातमी आहे. आरोग्य विभागाला शोधूनही हे रुग्ण सापडत नाहीये. चुकीचा मोबाईल क्रमांक दिल्याने हा सर्व गोंधळ उडाल्याच समोर आलं असून तालुका आरोग्य प्रशासनासमोर आता या रुग्णांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. 
 
ग्रामीण भागात करोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून लक्षणे असलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. चाचणी करताना रुग्णांचा मोबाइल क्रमांक घेतला जात आहे. या चाचणीचा अहवाल दुसऱ्या दिवशी येतो. अशात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना त्यांच्या मोबाईल क्रमांकाववर संपर्क करुन माहिती दिली जात आहे. पण कन्नड शहरातील दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असताना नंबर चुकीचा असल्याने आता हे रुग्ण सापडत नाहीये.
 
दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी आरोग्य विभाग त्यांचा शोध घेत आहे, पण संपर्क करणे शक्य होत नाहीये. आता त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन तेथून काही माहिती मिळते का यासाठी प्रयत्न सुरू असल्याच आरोग्य विभागच म्हणणं आहे. त्यांचा शोध घेईपर्यंत किती जण संक्रमित होतील ही काळजीची बाब आहे.