गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 4 मार्च 2020 (13:57 IST)

कोरोना व्हारसची महाराष्ट्रात दहशत नाशिककध्ये संशयित रुग्ण

कोरोना या व्हारसची दहशत महाराष्ट्रातही पसरली आहे. कारण आता नाशिकमध्ये कोरोना व्हारसचा संशयित रुग्ण आढळला आहे. याआधी दिल्ली, तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. आता नाशिकमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळून आला आहे. एका व्यक्तीमध्ये कोरोना व्हारसची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
 
या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चीनहून भारतात परतलेले तीन रुग्ण केरळमध्ये होते ते बरे झालची बातमी समोर आली होती. त्यामुळे देशाने सुटकेचा निःश्र्वास सोडला होता. अशात आता दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळलची बातमी आली होती. देशात कोरोनाचे एकूण सातसंशयित रुग्ण आहेत. आता नाशिकच्या रुग्णाचे रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर त्यालाही कोरोना व्हारसची लागण झाल्याचे स्पष्ट होईल. सध्या नाशिकच्या या रुग्णावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हारसुळे घाबरुन जाऊ ने असे आवाहन केले आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी ही कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे दीर्घकाळ ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडे जाणस दिरंगाई करू नका. शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, पाळीव प्राण्यांपासून दूर राहा असे आवाहन वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे.