रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मार्च 2020 (16:45 IST)

‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही : मुख्यमंत्री

संजय राऊत घरचा माणूस आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. ‘सामना’तील भाषा ही आमची पितृभाषा आहे. ‘सामना’च्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे  गेली, तरी ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 
 
‘मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अनपेक्षित आली. सामना, शिवसेना आणि ठाकरे ही तिन्ही नावं वेगळी होऊ शकत नाहीत. म्हणून रश्मी ठाकरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. संजय राऊत आमच्या घरातले आहेत. संपादकीय विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे कायम राहील’ असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.