शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (15:19 IST)

झायडसने बनविलेल्या झायकोव्ह-डी लसीची चाचणी देशभरात सुरू

देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यासाठी  लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.या लसीकरण मोहीमेत नागरिकांना कोविशिल्ड,कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसींचा डोस दिला जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे झायडसने बनविलेल्या झायकोव्ह-डी (Zycov-D vaccine) लसीची चाचणी देशभरात सुरू आहे.या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात जे.जे. समूहाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात झायकोव्ह-डी लसीची चाचणी सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या चाचणीसाठी रुग्णालयाने २ हजार ७३७ लोकांची निवड केली. या सर्व लोकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे.लस दिल्यानंतर पाच महिन्यांनंतर केवळ २२ लोकांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, आजपर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले नाहीत आणि ही लस घेतल्यानंतर संक्रमित झालेल्या व्यक्तींमध्ये फक्त सौम्य आणि मध्यम लक्षणे असल्याचे आढळून आले आहे.