गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (09:38 IST)

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांच्यावर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांच्यावर पोहोचली आहे. राज्यात शुक्रवारी तब्बल २४ हजार ८८६ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १० लाख १५ हजार ६८१ इतकी झाली आहे. 
 
राज्यात शुक्रवारी दिवसभरात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १४,८०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच,  राज्यात सध्या २ लाख ७१ हजार ५६६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना मृत्यू दर हा २.८३ वर गेला आहे. दुसरीकडे १४ हजार ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १५ हजार ०२३ जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे झाले आहे.
 
सध्या राज्यातील मृत्यूदर २.८३ टक्के एवढा झाला आहे. तर आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५० लाख ७२ हजार ५२१ नमुन्यांपैकी १० लाख १५ हजार ६८१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १६ लाख ४७ हजार ७४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३८ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.