उपचाराधीन रुग्ण झाले कमी, राज्यात 40,712 ॲक्टिव्ह रुग्ण
महाराष्ट्रात सोमवारी 3 हजार 131 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 4 हजार 021 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 40 हजार 712 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65 लाख 27 हजार 629 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 44 हजार 744 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.20 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात 70 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत 1 लाख 38 हजार 616 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत 5 कोटी 73 लाख 07 हजार 825 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 72 हजार 098 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 704 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.