‘टिक-टॉक’ स्टार समीर खानला करोनाची लागण
मध्यप्रदेशचा ‘टिक-टॉक’ स्टार समीर खानला करोनाची लागण झाली आहे. समीरने त्याच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये मास्कची खिल्ली उडवली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
समीर मध्यप्रदेशच्या एका छोट्या जिल्ह्यातील राहणारा असून त्याठिकाणी करोनाची लागण झालेला हा पहिलाच व्यक्ती आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
टिकटॉक व्हिडीओमध्ये समीरने म्हटलं होतं, “अरे, तुम्ही एका छोट्याशा व्हायरसमुळे मास्क का घालत आहात? या छोट्याशा कापडाच्या तुकड्यावर का विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायचा असेल तर देवावर ठेवा.”
समीरला शुक्रवारी भोपाळच्या एम्स रुग्णालयात चाचणी केली असताना त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याला बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. आता रुग्णालयात मास्क घालून समीरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला.