तीन वर्षांपूर्वी जगभरात पसरलेला कोव्हिड-19 विषाणू चीन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला होता. हा दावा करून न थांबता अमेरिकेने चीनवर अनेक प्रश्नही उपस्थित केले होते. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनमध्ये 2018 ते 2021 पर्यंत संचालक पदावर राहिलेले डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी बुधवारी (8...