बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 2 मे 2020 (10:48 IST)

3 मेच्या बैठकीत आषाढीवारी होणार की नाही? याचा निर्णय होईल

जुलै महिन्यात होणाऱ्या आषाढीवारीच्या सोहळ्यावर देखील कोरोनाचं सावट आहे. सोहळा करावा कि नाही, यावर चर्चा घेण्यासाठी ३ मे रोजी राज्यभरातील पालखी सोहळा प्रमुख आणि महाराज मंडळींची ऑनलाईन बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यातील वारकऱ्यांचं लक्ष लागून आहे.

रविवारी होणाऱ्या या बैठकीत आषाढी वारीबाबत सर्वानुमते निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. दरवर्षी आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात लाखोंच्या संख्येत भाविक दाखल होतात. देशातील विविध भागातील भाविकांची गर्दी येथे पाहायला मिळते. मात्र यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं सावट असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, नुकताच केंद्र सरकारकडून देशातील लॉकडाउनमध्ये १७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील लॉकडाउनमध्ये सलग तीनदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा हा वाढता प्रभाव आणखी किती काळ सुरू राहणार त्याची शाश्वती कोणाकडूनही दिली जात नाही आहे. त्यामुळे नागरिकांनीच याची खबरदारी घेण्याची गरज आहे.