रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Updated : रविवार, 7 ऑगस्ट 2022 (10:13 IST)

Friendship Quotes in Marathi मैत्री वर मराठी कोट्स

friendship
पैश्या पेक्षा मित्र कमवा तेव्हा जास्त श्रीमंत व्हाल.
 
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
 
मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी.
 
समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.
 
शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते, म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.
 
रक्ताच्या नात्यापेक्षा एक घट्ट नात असत ते म्हणजे मैत्री.
 
मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार.
 
मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी.
 
 मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी. पण कधीच बदलणारी नसावी.
 
 मैत्रीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी फक्त त्या वेलीला मैत्रीची पान असावी.
 
 मैत्री जपण म्हणजे फुलाला जपण्यासारखं आहे, कविता लिहिण्यापूर्वी शब्द ओठांना टेकण्यासारख आहे.
 
 कोणीतरी एकदा विचारलं मित्र आपला कसा असावा, मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक गुण दोष दोन्ही दाखवणारा.
 
 मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो.
 
ना सजवायची असते , ना गाजवायची असते , ती तर नुसती रुजवायची असते …!