शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (16:19 IST)

Hartalika Aarti हरितालिकेची आरती

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥
 
हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥ तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥
 
रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥ उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥
 
तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥
 
लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥ पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥
 
काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥ माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥