शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Updated : बुधवार, 1 जुलै 2020 (14:27 IST)

गुरुपौर्णिमा 2020 तिथी, मुहूर्त आणि महत्त्व

हिंदू धर्मामध्ये गुरूला देवापेक्षाही श्रेष्ठ मानले आहे. कारण गुरूच संसाररूपी भवसागराला पार करण्यास मदत करतात. गुरूच्या ज्ञान आणि सांगितलेल्या मार्गावर चालून माणूस मोक्ष मिळवतो. शास्त्रांमध्ये म्हटलं आहे की जर देवांनी आपल्याला श्राप दिले तर त्यापासून गुरु रक्षण करतात पण जर का गुरूने आपल्याला श्राप दिला तर देव सुद्धा आपले रक्षण देव करू शकत नाही. 
 
म्हणूनच कबीर दास जी म्हणतात -
गुरु गोविन्द दोनों खड़े, काके लागूं पाँय।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो बताय॥
 
दर वर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात. गुरु पौर्णिमेला गुरुची पूजा करतात. भारतात हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. प्राचीन काळात शिष्य गुरूच्या आश्रमात बिनामूल्य शिक्षण घेत असे तर या दिवशी पूर्ण श्रद्धेने आपल्या गुरुची पूजा करत असत. या दिवशी गुरूचीच नव्हे, तर कुटुंबातील वडिलधाऱ्यांची जसे की आई-वडील, भाऊ -बहीणीला गुरुसम मानून त्यांचा कडून आशीर्वाद घेतले जातात.
 
गुरु पौर्णिमेचं महत्व : 
हिंदू धार्मिक ग्रंथानुसार महाभारताचे निर्माते कृष्ण द्वैपायन व्यास यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. ते संस्कृतचे विद्वान होते. महाभारतासारखे महाकाव्य त्यांचीच देणगी आहे. या महाकाव्याचा 18 व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण गीतेचा उपदेश देतात. सर्व 18 पुराणांचे निर्मिते देखील महर्षी वेदव्यास होते. वेदांच्या विभक्तीकरणाचे श्रेय यांनाच दिले गेले आहे. या कारणास्तव त्यांचे नाव वेदव्यास असे. वेदव्यासांना आदिगुरू असे ही म्हणतात, म्हणून गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे ही म्हणतात.
 
गुरु पौर्णिमा पावसाळ्यातच श्रेष्ठ का?
भारत वर्षात सर्व ऋतूंचे आपापले महत्व आहे. गुरु पौर्णिमा पावसाळ्यातच का साजरी केली जाते या मागे देखील एक कारण आहे. कारण या महिन्यात न जास्त उष्णता असते न जास्त हिवाळा असतो. ही वेळ अभ्यास आणि अध्यापनासाठी अनुकूल असते. म्हणून गुरूच्या सानिध्यात असलेले सर्व शिष्य ज्ञान, शांती, भक्ती आणि योगाची शक्ती प्राप्त करण्यासाठी या वेळेची निवड करतात. 
 
गुरु पौर्णिमेची तिथी आणि मुहूर्त 2020 
गुरु पौर्णिमा 2020
तारीख: 5 जुलै 
गुरु पौर्णिमा तिथी प्रारंभ - 11 : 33 वाजता (4 जुलै2020)
गुरु पौर्णिमा तिथी समाप्ती - 10:13 (5 जुलै 2020).