Guru Purnima 2021: गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त
धार्मिक शास्त्रानुसार आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला आषाढी पूर्णिमा, गुरु पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे. यावर्षी, पौर्णिमा तिथी शुक्रवार, 23 जुलै 2021 रोजी सुरू होईल आणि शनिवार, 24 जुलै रोजी साजरा केला जाईल.
महर्षि वेद व्यास हे प्रथम गुरु मानून त्यांच्या सन्मानार्थ गुरु पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. महर्षि वेद व्यास यांनीच सनातन धर्माचे चार वेद समजावून सांगितले. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की महर्षि वेद व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेवर झाला होता. गुरु वेद व्यासांनी पहिल्यांदा मानवजातीला चार वेदांचे ज्ञान दिले असल्याने ते सर्वांचे पहिले गुरु झाले. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी हा सण त्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्याला व्यास पूर्णिमा देखील म्हणतात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा (Guru Purnima 2020) चा सण साजरा केला जातो.
गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त :
23 जुलै 2021 रोजी सकाळी 10.45 मिनिटापासून पौर्णिमा तिथी प्रारंभ होईल आणि 24 जुलै सकाळी 08.08 मिनिटावर समाप्त होईल.
गुरु पौर्णिमा शुभ वेळ-
अमृत काल- सकाळी 01:00 वाजेपासून ते सकाळी 02:26 मिनिटापर्यंत
ब्रह्म मुहूर्त- पहाटे 04:10 मिनिटापासूत ते 04:58 मिनिटापर्यंत
अभिजीत मुहूर्त- दुपारी 12:02 मिनिटापासून ते 12:56 मिनिटापर्यंत
मंत्र-
* ॐ गुं गुरुभ्यो नम:।
* ॐ गुरुभ्यो नम:।
* ॐ परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम:।