सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified शनिवार, 5 जून 2021 (13:10 IST)

Apara Ekadashi Katha : वैशाख कृष्ण एकादशीचं महत्त्व, सर्व पापांपासून मुक्ती देणारं व्रत

वैशाख कृष्ण एकादशीला अपरा एकादशी असेही संबोधले जाते. जेव्हा धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले की - हे भगवान! वैशाख कृष्ण एकादशीचे नाव काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे, कृपया मला सांगा?
 
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे राजन! ही एकादशी अचला किंवा अपरा या दोन नावांनी ओळखली जाते. हे व्रत पापरूपी वृक्ष कापण्यासाठी कुर्‍हाड आहे. पापरूपी इंधन पेटवण्यासाठी अग्नि, पापरूपी अंधकार मिटविण्यासाठी सूर्य समान, मृग मारण्यासाठी सिंहासमान आहे. म्हणून पापांची भीती बाळगत हे व्रत अवश्य करावं.
 
* पुराणानुसार वैशाख कृष्ण पक्षाच्या एकादशीला अपरा एकादशी असते, जी अपार धन प्रदान करणारी असते. जे लोक हा व्रत पाळतात, ते जगात प्रसिद्ध होतात.
 
* या दिवशी भगवान त्रिविक्रमची पूजा केली जाते.
 
* अपरा एकादशी व्रताच्या परिणामामुळे ब्रह्म हत्या, भूत योनी, इतरांची निंदा करणे इतर सर्व पाप दूर होतात. 
 
* हे व्रत केल्याने परस्त्रीगमन, खोटी साक्ष देणे, खोटे बोलणे, खोटे शास्त्र वाचणे किंवा बनवणे, खोटे ज्योतिषी बनणे आणि खोटे वैद्य होणे इतर सर्व पाप नाहीसे होतात.
 
* अपरा एकादशी व्रत व परमेश्वराची उपासना केल्याने, व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि विष्णुलोकाकडे जाते.
 
* युद्धातून पळून जाणारे क्षत्रिय नरकात जातात, पण अपरा एकादशीचे व्रत ठेवून ते स्वर्गात पोहोचतात. जे शिष्य गुरूंकडून शिक्षा घेतात आणि मग त्यांची निंदा करतात ते नक्कीच नरकात पडतात, परंतु अपरा एकादशीचे व्रत ठेवून ते देखील या पापापासून मुक्त होतात.
 
* मकर राशीच्या सूर्यामध्ये प्रयागराजात स्नान करून, शिवरात्रि उपवास करून, सिंह राशीचे बृहस्पतिमध्ये गोमती नदीत स्नान करून, कुंभातील केदारनाथ किंवा बद्रीनाथाचे दर्शन, सूर्यग्रहणावेळी कुरुक्षेत्रात स्नान केल्याने, स्वर्णदान केल्याने किंवा गर्भवती गाईचे दान केल्याने मिळणारे फळ अपरा एकादशीला उपवास केल्याने मिळते.
 
* कार्तिक पौर्णिमेला तीनही पुष्करांमध्ये स्नान करून किंवा गंगाच्या काठावर पूर्वजांना पिंडदान देऊन जे फळ मिळतं ते अपरा एकादशीचे व्रत ठेवल्यास प्राप्त होते.
 
अपरा एकादशी कथा
 
प्राचीन काळात महीध्वज नावाचा एक धर्मात्मा राजा होता. त्याच्या लहान भाऊ वज्रध्वज अत्यंत क्रूर, अनीतिमान व अन्यायी होता. त्याला आपल्या भावाचा द्वेष होता. एकेदिवशी त्या पापी भावाने आपल्या मोठ्या भावाची हत्या करुन त्याचे देह एका जंगलात पिंपळाच्या झाडाखाली दफन केले.
 
या अकाळ मृत्यूमुळे राजा प्रेतात्मा या रुपात त्या पिंपळावर राहू लागला अनेक अनेक उत्पात करु लागला. एकेदिवस अचानक धौम्य नावाचे ऋषी तिकडून जात होते. त्यांनी प्रेत बघितलं आणि तपोबळाने त्याच्या अतीतबद्दल जाणून घेतलं. त्यांना आपल्या शक्तीमुळे प्रेत हिंसा करण्याचे कारण समजले.
 
ऋषींनी प्रसन्न होऊन त्या प्रेताला पिंपळाच्या झाडावरुन खाली आणले आणि  परलोक विद्येचे उपदेश दिले. दयाळू ऋषीने राजाला प्रेत योनितून मुक्त करण्यासाठी स्वत: अपरा (अचला) एकादशी व्रत केलं आणि त्याला अगतीपासून सोडवण्यासाठी त्याचं पुण्य प्रेताला अर्पित केलं. या पुण्य प्रभावामुळे राजाला प्रेत योनिततून मुक्ती मिळाली.
 
ते ॠषींचा आभार व्यक्त करत दिव्य देह धारण करुन पुष्पक विमानात बसून स्वर्गलोक गेले. म्हणून अपरा एकादशी कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. अपरा एकादशी व्रत केल्याने आनंद व सुख प्राप्ती होते.