बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

बालब्रह्मचारी हनुमानाच्या मुलाचा जन्म कसा झाला जाणून घ्या

hanuman son Makaradhwaja
बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र, त्याचे नाव माहित आहे का?
हनुमानाच्या पुत्राची कथा लंका दहन आणि अहिरावण द्वारा श्री राम आणि लक्ष्मण यांच्या अपहरणाशी जुळलेली आहे-
 
- लंका दहन झाल्यावर हनुमान आपली जळत असलेली शेपूट समुद्राच्या पाण्यता शांत करण्यासाठी पोहचले.
 
- असे म्हणतात की त्यावेळी त्यांच्या घामातून पडलेला एक थेंब समुद्रातील मोठ्या मासोळीने गिळून घेतला. त्या घामाच्या थेंबामुळे मासोळी गर्भवती झाली.
 
- मग एके दिवशी अधोलोकाचा राजा अहिरवणाच्या सेवकांनी मासोळी पकडल्यावर पोट कापले तर त्यामधून वानरसारखा माणूस बाहेर आला.
 
- ते त्या वानराला अहिरावणाकडे घेऊन गेले. अहिरावणाने त्याला पाताल रक्षक नियुक्त केले. हे वानर 'मकरध्वज' या नावाने प्रसिद्ध झाले.
 
- रावणाच्या सांगण्यावरून अहिरवणाने राम आणि लक्ष्मणाचे अपहरण करून अधोलोकात नेले.
 
- त्यांना मुक्त करण्यासाठी हनुमान अधोलोकात गेले असताना त्यांची मकरध्वजाशी भेट झाली.
 
- हनुमानाला बघून मकरध्वजाने आपल्या उत्पत्तीची कथा सांगितली.
 
- हनुमानजींनी अहिरावणाचा वध करून श्री राम-लक्ष्मणाला मुक्त केले आणि मकरध्वजला अधोलोकाचा राजा म्हणून नियुक्त केले.