शनिवार, 14 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (15:53 IST)

कर्णाच्या बायका कोण होत्या जाणून घ्या

आपण सर्व कर्ण आणि त्याच्या महानतेबद्दल जाणूनच आहोत. महाभारतातील कुंतीपुत्र कर्णाचा सांभाळ अधिरथ आणि राधाने केला होता. कर्ण त्यांना गंगेच्या पाण्यातून वाहत असलेल्या एका मंजुषेत ठेवलेला सापडला. त्या वेळी धृतराष्ट्राचा सारथी म्हणून काम करणारा अधिरथ घोडयांना पाणी पाजत होता. त्याने त्या बाळाला बघतातच उचलून आपल्या घरी नेले. त्याला काहीही अपत्य नव्हते. त्याने आणि त्याच्या पत्नी राधाने त्या बाळाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले. त्या बाळाचे कान सुंदर असल्याने त्याचे नाव कर्ण ठेवले. सूत दांपत्याने त्याचा सांभाळ केला म्हणून त्याला सूत-पुत्र असे ही म्हटले जात होते. राधा आईचे नाव असल्यामुळे त्याला राधेय देखील म्हणत असे.
 
वृषाली आणि सुप्रिया - ह्या कर्णाच्या दोन बायका होत्या. दोन्ही देखण्या आणि सुंदर होत्या. 'अंग देशाच्या या राजाच्या पहिल्या बायकोचे नाव वृषाली असे. तिच्या पासून त्यांना वृषसेन, सुषेण आणि वृषकेत नावाची 3 मुले झाली. वृषाली ही दुर्योधनाच्या रथाचे सारथी सत्यसेनची बहीण होती. ती फार चरित्रवान आणि पुण्यवती होती. वृषाली च्या संदर्भात अशी मान्यता आहे की तिने द्रौपदीला सल्ला दिला होता की तू हा राजवाडा सोडून आपल्या वडिलांकडे किंवा भावाकडे निघून जा. पण द्रौपदीने तिचा सल्ला ऐकला नाही आणि काहीच दिवसा नंतर द्रौपदीचे चीरहरण घडले.
 
कर्णाची दुसरी बायको सुप्रिया होती. ही दुर्योधनाची बायको भानुमतीची चांगली मैत्रीण होती. हिच्यापासून कर्णाला चित्रसेन, सुशर्मा, प्रसेन, भानुसेन नावाची मुले झाली. असे मानले जाते की सुप्रियालाच पद्मावती आणि पुन्नुरुवी असे ही म्हटले जाते.