मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (14:04 IST)

भगवान शिवांना 8 मुले आणि 1 मुलगी आहे, रोचक माहिती जाणून घ्या

असे म्हणतात की शंकराला एकूण 9 अपत्ये होती. त्या पैकी एक मुलगी व 8 मुले होते. त्यांच्या या 9 अपत्यांपैकी 2 मुलांचा उल्लेख कमीच आढळतो. जेव्हा आपण मुलांविषयी बोलायचे म्हटले तर त्यापैकी काही दत्तक घेतले होते आणि काही मुले चमत्कारिक पद्धतीने झाले होते. चला तर मग जाणून घेऊ या त्यांच्या विषयी. 
 
भगवान शिवच्या बायकां : 
भगवान शिवच्या किती बायका आहे? या विषयी वेग वेगळे संदर्भ आढळतात. भगवान शिव यांची पहिली बायको राजा दक्ष यांची मुलगी देवी सती होती. तिने यज्ञाच्या वेदीत उडी मारून आपले देह त्याग केले नंतर तिने हिमवान आणि हेमावती यांच्या घरात देवी पार्वती म्हणून जन्म घेतला आणि भगवान शंकराशी लग्न केले. त्यांची तिसरी बायको काली, चवथी उमा आणि पाचवी आई गंगा आहे. 
 
आई पार्वती यांना दोन मुले आणि एक मुलगी असे अपत्ये झाली. पहिल्या मुलाचे नाव कार्तिकेय, दुसऱ्या मुलाचे नाव गणेश आणि मुलीचे नाव अशोक सुंदरी ठेवले. असे म्हणतात की देवी पार्वतीने आपल्या एकटेपणाला संपविण्यासाठीच या मुलीला निर्मित केले.
 
1 कार्तिकेय : कार्तिकेय ह्यांना सुब्रम्हण्यम, मुरुगन आणि स्कंद असे ही म्हटले जाते. पुराणानुसार षष्ठी तिथीला कार्तिकेय भगवान यांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. 
 
2 गणेश : पुराणात गणेशाच्या उत्पत्तीच्या विषयी परस्पर विरोधी कथा आढळतात. भाद्रपदातील शुक्लपक्षाच्या चतुर्थीला मध्यान्हात गणेशाचा जन्म झाला. गणेशाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या चंदनाच्या लेपापासून झाली.
 
3 सुकेश : भगवान शंकराचा तिसरा मुलगा सुकेश होता. याचे दोन राक्षस भाऊ होते -' हेती आणि 'प्रहेती' प्रहेती संत बनला आणि हेती ने आपल्या साम्राज्याला वाढविण्यासाठी 'काळ' याची मुलगी 'भया' हिच्याशी लग्न केले. भया पासून ह्यांना विद्युतकेश नावाचा मुलगा झाला. ह्या विद्युतकेशाचे लग्न संध्या यांची मुलगी 'सालकटंकटासह झाले. असे म्हणतात की सालकटंकटा एक व्यभिचारी होती. म्हणून तिला मूल झाल्यावर त्या मुलाला बेवारशी सोडले. विद्युतकेश याने देखील त्या मुलाचा सांभाळ तो कोणाचा मुलगा आहे हे माहीतच नाही, असे समजून केला नाही. पुराणानुसार भगवान शिव आणि आई पार्वतीने त्या बेवारशी मुलाला बघितल्यावर त्याला संरक्षण दिले आणि त्याचे नाव सुकेश ठेवले. या सुकेशमुळे राक्षस कुळ वाढले. 
 
4 जालंधर : शिव यांना एक चवथा मुलगा देखील होता ज्याचे नाव जालंधर होते. श्रीमद्मदेवी भागवत पुराणानुसार, एकदा भगवान शंकराने आपले तेज समुद्रात फेकले त्यामुळे जालंधर याचा जन्म झाला. असे म्हणतात की जालंधर मध्ये अफाट शक्ती होती. त्याच्या या शक्तीचे कारण म्हणजे त्याची पत्नी वृंदा होती. त्याची पत्नी वृंदा ही पती धर्म मानणारी होती त्यामुळे सर्व देव मिळून देखील त्या जालंधरला हरवू शकत नव्हते. एकदा जालंधर ने भगवान विष्णूला हरवून देवी लक्ष्मीला विष्णू कडून हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वृंदा ने आपले पतिधर्म मोडले आणि त्यामुळे भगवान शिवाने जालंधराला ठार मारले.
 
5 अयप्पा : भगवान अयप्पा यांचे आई-वडील भगवान शिव आणि आई मोहिनी होती. भगवान श्री विष्णू यांचे मोहिनी रूप बघून भगवान शिव यांचे वीर्य गळून पडले. जे पारद म्हणवले त्या पारद पासून सस्तव नावाचे मूल जन्मले जे दक्षिण भारतात अयप्पा म्हणवतात. शिव आणि विष्णू पासून उत्पत्ती झाल्यामुळे ह्यांना 'हरिहरपुत्र' म्हणतात. भारतातील केरळ राज्यात शबरीमलई येथे अयप्पा स्वामींचे मंदिर आहे. इथे जगभरातील लोक शिवाच्या या मुलाच्या दर्शनास येतात. या मंदिराजवळ मकरसंक्रांतीच्या रात्री काळोख्यात एक प्रकाश दिसतो. या प्रकाशाच्या दर्शनासाठी जगभरातून कोट्यावधी भाविक दरवर्षी दर्शनास येतात.

6 भूमा : एके दिवशी कैलासावर भगवान शिव ध्यानस्थ बसले होते, त्यावेळी त्यांच्या कपाळावरून घामाच्या तीन थेंबा पृथ्वी वर पडल्या. त्या थेंबापासून पृथ्वीने एका गोंडस बाळाला जन्म दिला, ज्याला चार हात होते आणि ते बाळ  रक्ताच्या रंगाचे होते. या बाळाला पृथ्वीने सांभाळले. भूमीचा पुत्र म्हणून ह्याला भूमा किंवा भौम म्हटले. थोडं मोठा झाल्यावर मंगळ काशीला पोहोचला आणि भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. तेव्हा भगवान शंकराने त्याला प्रसन्न होऊन  मंगळ लोक दिले.
 
7 अंधक : अंधक देखील भगवान शिवचा मुलगा आहे असे सांगितले जाते पण ह्याचा उल्लेख कमीच आढळतो. 
 
8 खुजा : पौराणिक वर्णनानुसार खुजा हे पृथ्वीमधून बाहेर तीक्ष्ण किरणांप्रमाणे निघाले होते आणि सरळ आकाशमार्गी गेले.