रविवार, 6 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2019 (14:43 IST)

मंत्र आणि तंत्र

मनाचा मृत्यूच मोक्ष होय
 
मन पाण्यासारखे असते. ज्याप्रमाणे पाणी उतारावर वाहते त्याप्रमाणे मन संसार विषयांकडे वाहते. आणि स्वत:ची अधोगती करून घेते. पाण्याप्रमाणेच मानची सवय आहे ते पैशाचे चिंतन करते. हीच त्याची सवय पापकर्म करण्यास प्रेरित करते. जेव्हा मनाची ही सवय तुटेल व मन उर्ध्वगामी बनेल तेव्हाच जीवनात शांती आणि संतोष नांदेल. मनाला उर्ध्वगामी करण्याची रीत कोणती आहे? 
 
खाली वाहणार्‍या पाण्याला यंत्राच्या सहाय्याने वर चढवता येते त्याप्रमाणे अधोगतीकडे वाहणार्‍या मनला भगवंताच्या नामरूपी मंत्राने उर्ध्वगामी करता येते. ते नामाने भगवंताकडे पोहचू शकते. म्हणून मनाला सतत नामात गुंतवून ठेवावे. नामस्मरणात मंत्राचे सामर्थ्य आहे. अनेक पुस्तके वाचून किंवा तीर्थतयात्रा करून मन सुधारत नाही ते केवळ नाम मंत्रोनेच सुधरते. 
 
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
 
अनुवादकः सौ. कमल जोशी