गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (12:36 IST)

मिथुन संक्रांती पौराणिक कथा आणि पाटा वरवंट्याच्या पूजेचे महत्त्व

आपल्याला माहित आहे की निसर्गाने पृथ्वीवरील सर्व स्त्रियांना मासिक पाळीचे वरदान दिले आहे. मासिक पाळीमुळेच आई होण्याचे सौभाग्य प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार मिथुन संक्रांतीच्या दिवशी भू देवी किंवा पृथ्वी मातेला सलग 3 दिवस मासिक पाळी आली होती, जे पृथ्वीच्या विकासाचे प्रतीक मानले जाते, म्हणून पृथ्वी मातेचे रूप लक्षात घेऊन पाटा वरवंटा म्हणजे सिलबट्टाला स्नान घातलं जातं. त्याची पूजा केली जाते.
 
यासाठी मिथुन संक्रांतीच्या दिवशी स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. यानंतर पाटा वरवंट्याला पाणी आणि दुधाने स्नान करवावे. नंतर त्यावर सिंदूर आणि चंदन लावावे, फुले व हळद अर्पण करावी.