बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (17:03 IST)

शंकर आणि अर्जुनमध्ये झाले होते युद्ध, प्रसन्न होऊन शंकराने दिले होते दिव्यास्त्र

महाभारतात जेव्हा कौरव आणि पांडवामध्ये युद्ध होणे निश्चित झाले होते तेव्हा अर्जुनाला देवराज इंद्राकडून  दिव्यास्त्र हवे होते. म्हणून अर्जुन इंद्राला भेटायला इंद्रकील पर्वतावर पोहोचला. इंद्रकील पर्वतावर इंद्र प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला म्हटले की माझ्याकडून जर दिव्यास्त्र प्राप्त करायचे असेल तर तुला आधी महादेवाला प्रसन्न करावे लागणार आहे. इंद्राची गोष्ट ऐकून अर्जुनने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरू केली.
 
अर्जुन जेथे तपस्या करत होता, तेथे मूक नावाचा एक असुर जंगली डुकराचे रूप धारण करून पोहोचला. त्याला अर्जुनला मरायचे होते. ही बाब अर्जुनला कळली होती आणि त्याने धनुष्यावर बाण चढवला आणि जसाच तो बाण सोडायला निघाला, त्या वेळेस महादेव एका वनवासीच्या वेषमध्ये तेथे आले आणि अर्जुनाला बाण चालवण्यापासून रोखले. 
           
वनवासीने अर्जुनला म्हटले की या असुरावर माझा अधिकार आहे, हा माझा शिकार आहे, कारण तुझ्याआधी मी याला आपले लक्ष्य बनवले होते. म्हणून याला तू मारू शकत नाही, पण अर्जुनने ही गोष्ट मानण्यास नकार दिला आणि धनुष्यातून बाण सोडला. तसेच वनवासीने देखील एक बाण डुकराकडे सोडला.
 
अर्जुन आणि वनवासीच्या बाण एकाच वेळेस डुकराला लागला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अर्जुन त्या वनवासीकडे गेला आणि म्हटले की हा डुक्कर माझा लक्ष्य होता, यावर तुम्ही बाण कसा सोडला ?
           
या प्रकारे वनवासी आणि अर्जुन दोघेही त्या डुकरावर आपला आपला अधिकार गाजवायला लागले. अर्जुनला ही गोष्टमाहीत नव्हती की वनवासीच्या वेषात स्वत: महादेव आहे. वाद विवाद एवढा वाढला आणि दोघे एक मेकसोबत युद्ध करण्यास तयार झाले होते.
          
अर्जुनने आपल्या धनुष्याने वनवासीवर बाणांची वर्षा केली, पण एक ही बाण वनवासीला नुकसान पोहचवू शकला नाही. जेव्हा फार प्रयत्न केल्यानंतर अर्जुन वनवासीला जिंकू शकला नाही तेव्हा त्याला कळले हा वनवासी कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे. पण जेव्हा वनवासीने प्रहार केले तेव्हा अर्जुन त्या प्रहारांना सहन करू शकला नही आणि अचेत झाला.
 
काही वेळेनंतर अर्जुन जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने मातीचा एक शिवलिंग बनवला आणि त्यावर एक माळ वाहिली. अर्जुनला जाणवले की जी माळ त्याने शिवलिंगावर चढवली होती, ती त्या वनवासीच्या गळ्यात दिसत होती. 
 
हे बघून अर्जुन समजून गेला की महादेवानेच वनवासीचा वेष धारण केला आहे. हे माहिती झाल्यावर अर्जुनने महादेवाची आराधना केली. महादेव देखील अर्जुनच्या पराक्रमाने प्रसन्न झाले आणि पाशुपतास्त्र दिला. महादेवाच्या प्रसन्नते नंतर अर्जुन देवराजच्या इंद्राजवळ गेले आणि त्यांच्याकडून  दिव्यास्त्र प्राप्त केले.