शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

नंदीच्या कानात का केली जाते प्रार्थना

आपण मंदिरात बघितले असेल की भक्त महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना करतात. यामागील मान्यता आहे की नंदी ‍महादेवाच्या गणांमध्ये सर्वात प्रिय आहे. महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना केल्याने ती सरळ महादेवाला पोहचते अशी समजूत आहे.
 
अधिकश्या काळ महादेव समाधिस्थ असतात असे मानले आहेत म्हणून अशा परिस्थितीत भक्त नंदीला आपली प्रार्थना सांगतात. तसेच महादेव धर्मावर आश्रित आहे कारण त्यांचे वाहन नंदी आहे. नंदीच्या कानात प्रार्थना करणे अर्थात कानाचा गुण आहे शब्द.
 
सर्पाशिवाय दुनियेत असा प्राणी नाही ज्याला कान नाही. कान शब्द ऐकून पूर्ण भावाने अंतरआत्म्यापर्यंत पोहचवतो, नंतर ते सर्वव्याप्त होऊन जातं. शब्दाचा गुणही आकाश आहे. आकाश नसल्यास शब्द ऐकू येणार नाही. म्हणून धर्माला आधार बनवून आकाशासमोर आपली गोष्ट सांगण्यात येते. जेणेकरून महादेव समाधितून उठल्यावर नंदी भक्तांची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहवतो आणि भक्तांची इच्छा पूर्ण होते.