सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (13:34 IST)

एकादशी व्रत करणार्‍यांनी फलाहार या प्रकारे घ्यावा

पुराण आणि धर्मग्रथांमध्ये उल्लेख सापडतो की एकादशी व्रत करणार्‍यांनी फलाहार कशाप्रकारे घ्यावा- 
 
चैत्र कृष्ण एकादशीला चारोळी आणि शुक्ल पक्ष एकादशीला लवंग फलाहारच्या रुपात घ्यावे. 
या प्रकारे वैशाख कृष्ण पक्ष एकादशीला खरबूज आणि शुक्ल पक्षात गोमूत्र.
ज्येष्ठ कृष्ण पक्ष एकादशीला काकडी आणि शुक्ल पक्ष एकादशीला निर्जला व्रत करावं. या दिवशी आंबे दान करावे
आषाढ कृष्ण एकादशीला खडीसाखर, शुक्ल पक्ष एकादशीला द्राक्ष.
श्रावण कृष्ण एकादशीला गो दुग्ध, शुक्ल पक्ष एकादशीला शिंघाडे.
भाद्रपद कृष्ण एकादशीला खारक, शुक्ल पक्ष एकादशीला बालम काकडी. 
आश्विन कृष्ण पक्ष एकादशीला कलाकंद, शुक्ल पक्ष एकादशीला फळं सेवन करावे.
कार्तिक कृष्ण एकादशीला केळी, शुक्ल पक्ष एकादशीला बिल्व पत्र.
मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला गूळ - बादाम, शुक्ल पक्ष एकादशीला राजगिरा.
पौष कृष्ण एकादशीला तीळ- गूळ, शुक्ल पक्ष एकादशीला गौ दुग्ध किंवा ताक.
माघ कृष्ण पक्ष एकादशीला तीळ पापडी, शुक्ल पक्ष एकादशीला ऊस.
फाल्गुन कृष्ण एकादशीला शिंघाडा आणि शुक्ल पक्ष एकादशीला आवळ्याचा फलाहार करावा. 
 
 
ज्या महिन्याच्या एकादशीला जे फलाहार घ्यायचे आहे, तेच पदार्थ त्या दिवशी फलाहार करण्यापूर्वी दान करावे. 
हे फलाहार सक्षम व्रत करणार्‍यांनी घ्यावे. वृद्ध, मुलं, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि भूक सहन करु शकत नाही अश्या जातकांना योग्य फलाहार करण्याची सूट आहे.