सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

संसदेतून दररोज 160 वेळा पॉर्न वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न

ब्रिटनच्या संसदेतून 2017 या वर्षात प्रत्येक दिवशी 160 वेळा पॉर्न वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनच्या प्रेस असोसिएशन (पीए)ने सोमवारी हा खुलासा केला. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर संसदेच्या इंटरनेट नेटवर्कशी जोडण्यात आलेल्या नेटवर्कद्वारे 24 हजार 473 वेळा अश्लील वेबसाईट पाहण्याचा प्रयत्न केला गेला. ही माहिती ‘डेटा फ्रीडम ऑफ इन्फर्मेशन’द्वारे मिळाली आहे. 
 
ब्रिटनच्या राजकारणात सध्या पॉर्न प्रकरण गाजत आहे. ख्रिसमसपूर्वी पंतप्रधान थेरेसा मे यांना त्यांचे निकटवर्तीय आणि फर्स्ट सेक्रेटरी ऑफ स्टेट उपपंतप्रधान डॅमियन ग्रीन यांना काढून टाकावे लागले होते. ग्रीन यांनी कार्यालयातील संगणकावर पॉर्न व्हिडीओ पाहिला होता. 2008 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्सच्या कार्यालयातील त्यांच्या संगणकावर त्यांनी पॉर्न पाहिल्याचे संसदीय समितीच्या चौकशीत सिद्ध झाले होते.
 
संसदेतील इंरटनेटचा वापर संसदेतील सदस्य, वरिष्ठ अधिकारी, कार्यालयातील अधिकारी करतात. अधिकाऱ्यांच्या मते संसदेतील सदस्य मुद्दाम अशा साईट्स पाहत नाहीत. तसेच गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा याचे प्रमाण कमी झाले आहे. 
 
ब्रिटनच्या संसदेत सर्व पॉर्न वेबसाईट ब्लॉक करण्यात आल्या आहेत. अशा वेबसाईट्सना भेटी देण्याचा प्रयत्न मुद्दाम केला जात नसल्याचे संसदेतील प्रवक्त्याने ‘पीए’ला सांगितले. पॉर्न पाहण्याचा प्रयत्न अशा डिव्हाइसमधून देखील केला जातो, जे संसदेच्या गेस्ट वाय-फायचा उपयोग करतात. 2016मध्ये 1 लाख 13 हजार 208 वेळा असा प्रयत्न केला गेला होता. तर त्याआधी म्हणजे 2015साली 2 लाख 13 हजार 20 वेळा असे प्रयत्न झाले होते. अश्लील वेबसाईट पाहण्याचे प्रयत्न कमी करण्यात यश आल्याचे प्रवक्त्याने सांगितले.