शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (17:21 IST)

मेक्सिकोमध्ये एका सशस्त्र व्यक्तीने गोळीबार केला, शहराच्या महापौरांसह 12 जण ठार

मेक्सिकोच्या ग्वानाजुआटो येथील इरापुआटो येथील एका बारमध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) एका सशस्त्र व्यक्तीने गोळीबार केला. या घटनेत सहा पुरुष आणि सहा महिलांसह बारा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तो लवकरच पकडला जाईल, अशी आशा केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बीएनओ न्यूजने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, गुरेरो राज्याच्या सिटी हॉलमध्ये बंदुकधारींनी गोळीबार केला. यामध्ये नगराध्यक्षांसह १२ जणांचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की हल्लेखोराने अनेक गोळ्या झाडल्या, त्यामुळे लोक पळून जाण्यासाठी इकडे-तिकडे धावताना दिसले. 
 
या घटनेबाबत मेक्सिकन पत्रकार जेकब मोरालेस यांनीही ट्विट केले आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, ज्यामध्ये 12 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. गुरेरो वायलेन्‍शियाच्‍या आतील भागात आहे, जेथे सध्‍या जत्रेची तयारी सुरू आहे. ग्युरेरोचे गव्हर्नर एव्हलिन पिनेडा यांनी महापौर कॉनराडो मेंडोझा आल्मेडा यांच्या हत्येबद्दल आणि घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मेक्सिकोमध्ये सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. 
 
Edited By - Priya Dixit