रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

त्याने वीस वर्षांनी केली आंघोळ!

लंडन- सार्वजनिक स्वच्छतेबाबत युरोपियन लोकांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, हे काही सांगण्याची गरज नाही. कुठल्याही शहराचे चौक, सार्वजनिक इमारतींचे कोपरे, गल्ल्या याची साक्ष देऊ शकतात. वैयक्तिक स्वच्छतेबाबत मात्र आपण युरोपियन लोकांपेक्षा पुष्कळ बरे म्हणता येईल. एक तर थंडीमुळे तिथे आंघोळ आठवड्याच्या कोष्टकात बसवलेली असते, शिवाय अन्यही अनेक गोष्टी आपल्याला किळसवाण्या वाटू शकतात. आपल्याकडे तर त्रिकाळ स्नानचीही परंपरा आहे. इंग्लंडमधील एका माणसाने तर आता तब्बल वीस वर्षांनी आंघोळ केली आहे. अर्थात त्याने इतकी वर्षे आंघोळ न करण्यामागे त्याचे अगडबंब वजन हे कारण होते.
37 वर्षांच्या चार्ल्स पास्क याचे वजन 212 किलो होते. त्याने पंधरा महिने परिश्रम घेऊन सुमारे 90 किलो वजन घटवले आहे. वजन अधिक असताना त्याला आपली दैनंदिन कामे नीट करता येत नव्हती. मात्र, त्याच्या एका मित्राचा गेल्या वर्षी कर्करोगाने मृत्यू झाल्यावर तो आपल्या आरोग्यबाबत सजग झाला. त्याने वजन कमी करण्याचे ठरवले आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केला. आता तो बराच फिट झाला आहे. मात्र, पूर्वी तो बाथटबमध्ये बसू शकत नव्हता. त्यामुळे त्याने वीस वर्षे आंघोळीलाही सुट्टी दिली होती. आता मात्र त्याने बाथटबमध्ये बसून अंग यथेच्छ बुचकळून घेतले. वजन घटल्यामुळे आता जीवनातील हरवलेले अनेक प्रकारचे आनंद आपण लुटत आहोत, असे त्याने म्हटले आहे.