गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 जून 2024 (09:23 IST)

डेन्मार्कच्या पंतप्रधानांवर कोपनहेगनच्या भर रस्त्यात हल्ला, आरोपीला अटक

arrest
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यावर राजधानी कोपनहेगनच्या रस्त्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांना धक्का बसला आहे.
 
डेन्मार्कच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका चौकात एक व्यक्ती पंतप्रधानांच्या दिशेने आला आणि त्याने पंतप्रधानांवर हात उचलला. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
 
युरोपियन कमिशनर उर्सुला वॉन डेर लेन यांनी या हल्ल्याला 'घृणास्पद कृत्य' म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, युरोपमधील लोक ज्या तत्वांवर विश्वास ठेवतात आणि ज्यासाठी लढतात त्या धारणेच्या विरोधात हा हल्ला करण्यात आला आहे.
 
डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने या घटनेची माहिती देणारे निवेदन जारी केले आहे. या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, "शुक्रवारी, पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यावर कोपनहेगनच्या कल्चरवेटमध्ये एका व्यक्तीने हल्ला केला. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे पंतप्रधानांना धक्का बसला आहे."
डेन्मार्कच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराची चौकशी सुरू आहे, मात्र हल्ल्यामागचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही.युरोपियन युनियनच्या प्रमुखांनी या हल्ल्याचा निषेध केला. 

मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की आरोपी मागून आला आणि त्याने फ्रेडरिकसनला जोरात ढकलले. यामुळे ती अडखळली. मात्र, कोपनहेगन पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
 
हा हल्ला युरोपियन युनियन (EU) निवडणुकीपूर्वी झाला. EU च्या निवडणुका 9 जून रोजी होणार आहेत. डेन्मार्कचे पंतप्रधान फ्रेडरिकसेन सोशल डेमोक्रॅट्सचे EU आघाडीचे उमेदवार क्रिस्टेल शाल्डेमॉस यांच्यासोबत प्रचार करत आहेत. घटनेच्या वेळी त्या प्रचार आटोपून परतत होत्या.पलीकडून एक व्यक्ती आला आणि त्याने पंतप्रधानांच्या जोडीदाराच्या खांद्यावर जोरात धक्का दिला. धक्का खूप जोरदार होता, 
प्रत्यक्षदर्शींनी त्या व्यक्तीचे वर्णन उंच आणि पातळ असल्याचे सांगितले. तसेच सांगितले की, त्या व्यक्तीने सर्व काही पटकन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. 
 
अलीकडच्या काळात युरोपियन राजकारण्यांवर हिंसक हल्ले वाढले आहेत. 4 जून रोजी, अत्यंत उजव्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी पक्षाच्या एका राजकारण्याची मॅनहाइममध्ये एका संशयिताने बॉक्स कटरने हत्या केली.
 
Edited by - Priya Dixit