रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

यंदाही ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत भारतीय वंशाचा कार्तिक विजयी

‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत भारतीय वंशांच्या कार्तिक नेम्मानी या १४ वर्षांच्या मुलानं बाजी मारली आहे. कार्तिक मुळचा टेक्सास येथे राहणारा आहे. आठवीत शिकणाऱ्या कार्तिकनं भारतीय वंशांचा प्रतिस्पर्धी न्यासा मोदीला हरवून अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावला आहे.  स्पर्धा जिंकल्यानंतर कार्तिकला २००० अमेरिकन डॉलर रोकड, न्यूयॉर्क आणि हॉलिवूडची ट्रिप आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिझ्झा पार्टी असं बक्षिसही मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ११ ते १४ वर्षे वयोगटातील १६ स्पर्धक होते. ज्यात ९ मुली आणि ७ मुलांचा सहभाग होता.
 
स्पेलिंग बी स्पर्धेत जवळपास ५१६ स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम स्पर्धेत न्यासा आणि कार्तिक या दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला अखेर ‘koinonia’ या शब्दाची अचूक स्पेलिंग सांगून कार्तिकनं या प्रतिष्ठित पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. गेल्या काही वर्षांपासून ही स्पर्धा भारतीय वंशाचे अमेरिकन विद्यार्थी जिंकत आहेत.