गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (09:24 IST)

पाकिस्तानमध्ये दोन गाड्यांच्या धडकेत मोठा अपघात, 30 ठार, अनेक जखमी

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. यात आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर बरेच लोक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेस या दोन गाड्यांच्या दरम्यान सिंध प्रांतातील डहारकी आणि रेती रेल्वे स्थानकांदरम्यान धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
 
असेही वृत्त आहे की बरेच लोक रेल्वेमध्ये अडकले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मदत व बचावकार्य सुरू आहे.