बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (09:14 IST)

पाकिस्तानच्या हेरगिरीला चीनचे पाठबळ

पाकिस्तानने चीनच्या मदतीने दोन हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले. त्यामुळे चीनला भारतावर नजर ठेवणे सोपे होणार आहे. पीआरएसएस-१ आणि ‘पाक टीईएस-१ ए’उपग्रहांना चीनच्या इशान्य भागातील जिक्यूआन सॅटेलाइट लॉन्च सेंटरमधून चीनचे रॉकेट लॉन्च मार्च-२ सी लॉन्च केले. ही दुसरी वेळ आहे की, चीनने पाकिस्तानला उपग्रह प्रक्षेपणासाठी मदत केली होती. यापूर्वी ऑगस्ट २०११मध्ये चीनने संवाद उपग्रह पाक टीईएस-१ आर लॉन्च करताना पाकिस्तानला सहकार्य केले होते.
 
पीआरएसआस-१, पाक टीईएस-१ पैकी पाक टीईएस-१ पैकी पीआरएसआस-१ ची निर्मिती चीनकडून करण्यात आली होती. हा चीनकडून पाकिस्तानला विकण्यात आलेला पहिला ऑप्टिकल दूर संवेदी उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमांतून चीन पाकिस्तानच्या मदतीने कायम भारतावर टीकून राहिली. भारताने सर्जिकल स्ट्राईक्सवेळी पाकिस्तानकडून तयार करण्यात येणारी आत्मघाती पथके शोधण्यासाठी भारताने उपग्रहाची मदत घेतली होती.