गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (08:34 IST)

प्रिन्स हॅरी आणि मेगन लवकरच राजवाडा सोडणार

इंग्लंडच्या महाराणीच्या राजवाड्यात प्रिन्स हॅरी आणि सूनबाई मेगन मर्केल लवकरच राजवाडा सोडून नव्या घरात राहायला जाणार आहेत. थोरल्या सूनबाई केट मिडल्टन आणि धाकट्या सूनबाई मेगन मर्केल यांचे आपापसात खटके उडू लागल्याची चर्चा आहे. त्यामुळंच प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल राजवाडा सोडून, फ्रॉगमोर हाऊस या १० खोल्यांच्या नव्या घरात राहायला जाणार आहेत. 
 
प्रिन्स हॅरी आणि सिने अभिनेत्री मेगन मर्केल यांचा मे २०१८ मध्ये शाही विवाह सोहळा पार पडला होता. त्यांना लवकरच बाळ देखील होणार आहे. मेगननं बाळाला जन्म दिल्यानंतर रॉयल बेबीसह हे कुटुंब नव्या घरात राहायला जाणार आहे. ते दोघे सध्या केंजिंग्टन पॅलेस म्हणजेच मुख्य राजवाड्यातील दोन खोल्यामध्ये राहातात.