रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी भेटवस्तू परत करणार

हॉलिवूड अभिनेत्री मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा गेल्या महिन्यात पार पडला. लग्नापूर्वी दोघांनीही अधिकृतरित्या पाहुण्यांना भेटवस्तू न आणण्याची विनंती केली होती. भेटवस्तूऐवजी जगभरातील काही स्वयंसेवी संस्थांना आर्थिक सहाय्य देऊ करण्याचं आवाहनही त्यांनी पाहुण्यांना केलं होतं. तरीही  अनेक पाहुण्यांनी त्यातून जगप्रसिद्ध कंपन्यांनी या दोघांना महागड्या भेटवस्तू पाठवल्या.

यात आलिशान बॅग्स, महागडे स्विमसूट यांचाही समावेश आहे. यात कंपन्यांकडून आलेल्या विविध भेटवस्तूंची किंमत ही भारतीय मूल्याप्रमाणे जवळपास ६३ कोटींच्या घरात होती. शाही कुटुंबातील सदस्यानं कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू स्विकाराव्या याबद्दल काही नियम आहे.

अर्थात लग्नासाठी कंपन्यांकडून आलेल्या भेटवस्तू या ब्रँड प्रमोशनसाठी असाव्यात, त्या जोडप्यानं स्विकारणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्या ब्रँडचं प्रमोशन करण्यासारखं झालं आणि कोणत्याही ब्रँडचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रमोशन करणं हे शाही कुटुंबाच्या नियमात बसत नाही. म्हणूनच लवकरच या भेटवस्तू परत करणार आहेत.