गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (08:47 IST)

रशियात पुढील महिन्यापासून कोरोना लशीचं उत्पादन सुरू

कोरोनाची लस तयार करण्यात रशिया यशस्वी ठरली आहे. रशियात पुढील महिन्यापासून कोरोना लशीचं उत्पादन सुरू करणार आहे. रशियाच्या एका एजन्सी टीएएसएसने सांगितले की सध्या देशाच्या गरज पूर्ण करण्यासाठी कोरोना व्हायरसची लस बनविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीचं उत्पादन सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल.
 
कोरोना व्हायरसच्या लसीचा ट्रायल शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. या लसीला गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ ऐपीडेमीलॉजी अंड मायक्रोबायॉलॉडी तयार करीत आहे. या लसीचं ह्युमन ट्रायलमध्ये सहभागी घेणारे सर्वांमध्ये इम्युनिटी दिसत आहे. अशी माहिती रशियाचे संरक्षणमंत्री यांनी दिली.