शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (10:52 IST)

आठ कोटी रूपयांची बिल, करोनाबाधित रुग्णाच्या हाती सोपवलं १८१ पानांचं बिल

करोनाचा उपाचार घेणाऱ्या अमेरिकेतील एका रुग्णाला आजरापेक्षाही तेव्हा अधिक धक्का बसला जेव्हा त्याच्या हाती तब्बल ११ लाख डॉलर्स म्हणजे जवळपास ८.१४ कोटी रूपयांची बिल देण्यात आलं. 
 
फ्लोर यांना ईशाक येथील स्वीडिश मेडिकल सेंटरमध्ये तब्बल ६२ दिवस दाखल करण्यात आलं होतं. करोनाच्या संसर्गामुळे रुग्णाची प्रकृती खालावली होती. तसंच त्यांच्या पत्नीनं आणि मुलांनीही त्यांची प्रकृती सुधारण्याची आशा सोडून दिली होती. परंतू उपचारानंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. 
 
नंतर रुग्णालयाने त्याच्या हाती ११ लाख डॉलर्सचं बिल दिल्याची माहितीही त्यांनी दिली. फ्लोर यांना रुग्णालयानं तब्बल १८१ पानांचं बिल सोपवलं आहे. त्यामत आयसीयूच्या बेडचे दर दिवसाचे शुल्क म्हणून ९ हजार ७३६ डॉलर्स, २९ दिवसांचा व्हेंटिलेटरचा खर्च ८२ हजार २१५ डॉलर्स आणि हृदय, यकृत आणि फुफ्फुसांच्या उपचारांसाठीच्या दोन दिवसांचा खर्च तब्बल १ लाख डॉलर्स यांचाही समावेश आहे.
 
फ्लोर यांच्या आरोग्यविमा असल्यामुळे बहुतांश रक्कम ही त्यांना द्यावी लागणार नाही. तर दुसरीकडे अमेरिकेच्या संसदेनं करोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी विशेष कायदाही लागू केला आहे.