गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (09:41 IST)

जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केलेला एप 'टिक टॉक'

टिक टॉक एपने इतर सर्व एपला मागे टाकले आहे. नुकतेच सेंसर टॉवरच्या एका रिपोर्टमध्ये जानेवारी 2020 मध्ये टिक टॉकने व्हॉट्सएपला मागे टाकले आहे. तसेच जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केलेला एप म्हणून टिक टॉकने आपली नवी ओळख निर्माण केली आहे. टिक टॉक आणि त्याचे चायनीज व्हर्जन Duoyin जानेवारीमध्ये गुगल प्ले स्टोअर आणि एपल प्ले स्टोअरमध्ये 104 मिलियन (10.4 कोटी) वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.
 
टिक टॉकने जानेवारी 2020 मध्ये जगभरात सर्वाधिक वेळा डाऊनलोड केलेल्या व्हॉट्सएपला मागे टाकले आहे. टिक टॉकमध्ये जानेवारी 2019 च्या तुलनेने आता 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर डिसेंबर 2019 च्या तुलनेने 27 टक्क्यांची वाढ झाली आहे.
 
डाऊनलोडच्या या आकड्यामध्ये टिक टॉक टॉपच्या तीन मार्केट्सला दाखवण्यात आले आहे. यामध्ये 34.4 टक्के डाऊनलोडसह भारतात 1 नंबरवर आहे. तर ब्राझिलमध्ये 10.4 टक्के आणि अमेरिकेत 7.3 टक्के आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.