सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 1 मार्च 2018 (16:35 IST)

आता व्हॉट्सअॅपचे फॉरवर्ड मेसेज समजणार

आता व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरमुळे एखादा मेसेज कुणाला फॉरवर्ड केल्यास त्यावर 'Forwarded Message' असं लिहिलेलं असेल. त्यामुळे हा मेसेज कुणाचा तरी फॉरवर्ड केलाय, हे स्पष्ट होईल. WABetaInfo ने या फीचरबाबत माहिती दिली आहे. अँड्रॉईड व्हर्जन 2.18.67 मध्ये ही नवी अपडेट मिळेल. याशिवाय फीचरचा विंडोज व्हॉट्सअॅपमध्येही समावेश करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड आणि विंडोजच्या बीटा युझर्सना हे फीचर चाचणीसाठी दिलं आहे. या फीचरनंतर तुम्ही ग्रुपचं डिस्क्रीप्शनही बदलू शकता, जसं आतापर्यंत प्रोफाईलमध्ये डिस्क्रीप्शन जोडलं जात होतं. ग्रुपचं डिस्क्रीप्शन कुणीही बदलू शकतं किंवा त्यामध्ये बदल करु शकतं. याचं नोटिफिकेशन सर्वांना जाईल.