युट्यूबवर गाणे जोरदार व्हायरल, १ कोटींच्या घरात हिट्स
सोशल मीडियावर एक गाणे जोरदार व्हायरल होत आहे. भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता निरहुआ दिनेश लाल यादव याचे हे गाणे आहे. युट्यूबवर त्याचे गाण्याला १ कोटींच्या घरात हिट्स मिळाल्यात. आतापर्यंत १४,७००,२६३ इतक्या लोकांनी हे गाणे पाहिले आहे. यादव याच्यासोबत भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे पाहायला मिळत आहे. 'पुरानी बीवी बंद करा दा मोदीजी' हे गाणे व्हायरल होत आहे.आम्रपाली आपल्या पतीबरोबर वाद घालताना दिसत आहे. निरहुआ दारु प्राशन करुन येतो. त्यानंतर त्याची पत्नी त्याच्यावर रागावते. त्यानंतर तिचा पती एकदम गाणे गायला लागतो... तो मोदींच्या फोटोजवळ पडतो...आणि पुढे...त्याच्या भोजपुरी सिनेमाचे नाव आहे 'निरहुआ चलल लंदन', या सिनेमाचा ट्रेलर त्याने युट्यूबवर रिलीज केलाय.