शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. कारगिल विजय दिवस
Written By

URI The Surgical Strike 'कारगिल विजय दिवस' वर पुन्हा बघता येईल

URI The Surgical Strike या चित्रपटाने जवळपास दहा आठवडे देशातील सिनेमाघरांच्या तिकिट खिडकीवर जमून कमाई केली होती. जानेवारीमध्ये जेव्हा चित्रपट रिलीज होताना इतकी प्रसिद्धी मिळेल याचा अंदाज देखील नव्हता. आता हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटर्समध्ये परत येत आहे. होय देशभक्तीची भावना पैदा करणारा हा चित्रपट कारगिल विजय दिवस या निमित्ताने पुन्हा रिलीज होणार आहे. 26 जुलै रोजी देशभरातील जवळपास 500 स्क्रीन्सवर पुन्हा मू्व्ही रिलीज होणार आहे.
 
चित्रपटाचे प्रोड्यूसर रॉनी स्क्रूवाला यांनी म्हटले की 'हे चित्रपट तयार करण्याचा उद्देश्य, देशातील लोकांमध्ये गर्व व्हावं असा होता. सेना आपल्यासाठी करत असलेल्या कामाची जाणीव करून द्यायची होती. आता पुन्हा याला कारगिल विजय दिवसाला रिलीज करताना अभिमान वाटतंय.'
 
देशात सेनेच्या बेसवर सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर घेण्याची ही कहाणी पडद्यावर आणली होती दिग्दर्शक आदित्य धर यांनी. विक्की कौशलने यात मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटाने 243.77 कोटी रुपये कमाई केली होती. 
 
या चित्रपटाचं निर्माण केवळ 35 कोटी गुंतवून करण्यात आले होते. 7 कोटी याच्या प्रचारावर खर्च करण्यात आले होते. या प्रकारे केवळ 42 कोटी रुपयात तयार चित्रपटाने आपल्या गुंतवणुकीपेक्षा सहापट अधिक कमाई केली होती. 
 
'उरी' या चित्रपटात 'देवों के देव महादेव' या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले मोहित रैना देखील आहे. हा त्यांचा पहिला चित्रपट होता. समीक्षकांनी 'उरी' ला चांगली रेटिंग दिली होती पण त्यापलीकडे जाऊन लोकांनी चित्रपटाला आपली पसंत वेगळ्यानेच दर्शवली होती. विक्की कौशलसाठी देखील हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरला. आणि  'how's the josh? या स्लोगनने सर्वांच्या मनात घर केले.