गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 मार्च 2019 (08:40 IST)

राज ठाकरे यांची लोकसभेतून माघार १९ मार्चला मांडणार कारणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून अधिकृत रित्या माघार घेतली असून, मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पत्रक मनसेकडून प्रसिद्ध केले आहे. शिरीष सावंत मनसेचे नेते  यांनी हे पत्रक प्रसिद्ध केलय. 19 मार्च रोजी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, त्यामुळे परवा म्हणजे 19 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिक जाहीर करतात, याकडे राजकीय रीत्या  सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत मनसे पाठिंबा देणार अशी जोरदार चर्चा आहे. मनसेने नुकतंच पक्षाचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला आहे. या निर्णयामुळे मनसेच्या ताकदीबाबत अनेकजण शंका घेत आहेत. लोकसभा निवडणूक न लढण्यामागची राज ठाकरेंची रणनिती आता 19 तारखेलाच कळू शकणार आहे. त्यामुळे आता मनसे कश्या प्रकारे निवडणुकीत प्रभाव टाकणार हे पहावे लागणार आहे.