मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2019 (08:25 IST)

कासाची वल्गना करणारे लवकरच गायब होतील - संग्राम जगताप

अहमदनगरची निवडणूक चुरशीची झाली आहे. एका बाजूला कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्च्या पक्षाचे उमेदवार संग्राम जगताप आहेत. सुजय यांनी पक्ष सोडून भाजपा मध्ये प्रवेश केला तर विखे पाटील आणि पवार यांच्यात जोरदार तणाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादीने पूर्ण ताकद लावली असून उमेदवार निवडणून यावा म्हणून प्रयत्न करत आहेत.तर संग्राम जगताप हे विरोधक उमेदवारांवर होरदार टीका करत आहेत. ज्या लोकांनी खासदार दिलीप गांधींवर दबाव आणून नगरचे विमानतळ पळवून नेले. ते दक्षिण मतदारसंघाचा विकास काय करणार?म या तालुक्यात विमानतळ झाले असते, तर मोठा विकास झाला असता. त्यांनी विमानतळ उत्तरेत पळवले.पण स्वतःचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागोजागी हेलिपॅड तयार केले, असा टीकेचा टोला राष्ट्रावादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी मारला.जेऊर बायजाबाई येथे पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अयोजित करण्यात आली होती..आमदार जगताप आपल्या भाषणात म्हणाले, मी विधानसभेत शहराचे प्रतिनिधित्व करतो.शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरून सभागृहात आवाज उठवल्याने मला एक वर्षासाठी निलंबित केले होते. विरोधी पक्षनेते कितीवेळा निलंबित झाले ते त्यांनी सांगावे.मी शहरात रहात असलो, तरी माझी नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आहे. बाहेरचे लोक इथे येतील, गोड गोड बोलून मोठी स्वप्ने दाखवतील.विकासाच्या केवळ वल्गना करून जनतेला स्वप्ने दाखवणारे निवडणुकीनंतर  गायब होतील. पण मी कुठेही जाणार नसून कायम तुम्हाला भेटणारा आहे. असे त्यांनी म्हटले आहे.