सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 23 मे 2019 (10:59 IST)

सुप्रिया सुळे 193682 मतांसह आघाडीवर

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली असून सध्या सुप्रिया सुळे 193682 मतांसह आघाडीवर आहेत त्यांच्यापाठोपाठ भाजपच्या उमेदवार कांचन कुल 165925 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
 
सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये कांचन कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती. मात्र आता सुप्रिया सुळे पुन्हा एकदा मुसंडी मारताना दिसत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात समाधान व्यक्त होताना दिसत आहे.