गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (18:30 IST)

जनतेचा हा निर्णय अभूतपूर्व आहे - मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे आता हा कल आणि राज्य व देशातील निकाल पाहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की जनतेने दिलेला कौल फारच  अभुतपूर्व आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला आणि राज्यात महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला असून,  निवडणुकीत सुप्त लाट होती आणि त्याची त्सुनामी होणार हे  माहित होते. पंतप्रधान मोदींनी अभुतपूर्व विजय मिळवला असून, निवडणुकीत  'प्रो- इन्कम्बसी' पहायला मिळाली होती तर  महायुतीने एकत्र लढत उत्तम  कामगिरी केली आहे. राज्यातील जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या बाजूने मोठा विश्वास दाखविला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.सध्या आपल्या राज्यात दुष्काळ,  इतर समस्या आहेत. तरीही जनतेने दिलेला कौल अभुतपूर्व आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.