रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (14:32 IST)

21 कोटीच्या सुलतान रेड्याचे हृदयविकाराचा झटक्याने निधन

हरियाणातील कैथल जिल्ह्यात असा एक रेडा होता.ज्याचे राजशी थाट होते.त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.या कैथल गावातील या रेड्याने कैथल गावचेच नव्हे तर हरियाणाचे नाव प्रकाश झोक्यात आणले होते. त्याचे मालक नरेश बेनीवाल म्हणाले,अवघ्या जगात सुलतान प्रमाणे कोणी नव्हते आणि कदाचित नसणार.त्याच्या जाण्याचे दुःख झाले आहे.त्याची आठवण मनातून जात नाही.

सुलतानची किंमत 21 कोटी असण्याचे कारण त्याचे स्पर्म लाखात विकले जातात.सुलतान हजारो वीर्याचा डोस द्यायचा जे 300 रुपयाला विकले जायचे.त्यानुसार तो वर्षभरात लाखो रुपये कमवायचा.2013 मध्ये झज्जर, कर्नाल आणि हिसार येथे झालेल्या राष्ट्रीय पशु सौंदर्य स्पर्धेत सुलतान राष्ट्रीय विजेताचा मानकरी होता.गुरांच्या मेळाव्यात दहशत निर्माण करण्याऱ्या सुलतान मुळे त्याचे गाव प्रख्यात झाले.आज त्या गावाला प्रत्येक जण सुल्तानमुळे ओळखतो. 
 
राजस्थानातील पुष्कर मेळाव्यात या रेड्याची किंमत एका प्राणी प्रेमीने 21 कोटी ठरवली होती.पण सुलतान च्या मालकाने त्यास नकार दिला.ते म्हणाले की सुलतान माझ्या मुलाप्रमाणे आहे आणि मुलाचा मोल लावता येत नाही. सुलतानाचे मालक आणि त्यांचे भाऊ मुलांप्रमाणे त्याची काळजी घेत होते.त्याचे आम्ही लहानपणापासून मुला प्रमाणे लाड केले.पण त्याच्या निधनामुळे कुटुंबात उणिवाची भावना आहे.

सुलतान हा मुर्रा जातीचा सर्वांत उंच 6 फुटापेक्षा उंच रेडा होता.त्याचे वजन 1700 किलो होते.एकदा बसल्यावर तो सुमारे 7 ते 8 तास बसून राहायचा.तो दररोज 3000 रुपये किमतीचा चारा खात होता.त्याला दररोज 10 किलो धान्य आणि दूध दिले जात होते.सफरचंद आणि गाजर खायचा.त्याचे लाड राजशी थाटात व्हायचे. बेनीवाल म्हणाले की त्यांच्या कडे या जातीच्या 25 पेक्षा जास्त म्हशी आहे.