सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

फेमिनाच्या मुखपृष्ठावर 'ऐश्वर्या'

ऐश्वर्या राय बच्चनचा एक फोटो फेमिना या मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झळकला आहे. या फोटोत ऐश्वर्याचा लुक ग्लॅमरस आहे. फॅशन मॅगझिन फेमिनाने २०१८ तील सुंदर महिलांची यादी जाहीर केली आहे. त्याचमुळे या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर ऐश्वर्याचा फोटो आहे. 
 
फेमिना च्या कव्हरपेजवर असलेल्या फोटोत मेटालिक सिल्व्हर रंगाचा कोट ऐश्वर्याने घातला आहे. या कोटाला चायनिज कॉलर आहे. तसेच या कोटाची बटणेही स्टायलिश आहेत. टेक्सचर्ड ब्लॅक पँट आणि त्यावर सिल्व्हर रंगाचा कोट यातला ऐश्वर्याचा लुक लक्ष वेधून घेतो आहे. मोकळे सोडलेले केस आणि चेहेऱ्यावरचा मेक अप यामुळे हा फोटो अगदी परफेक्ट जमून आला आहे.